esakal | ‘नादसाधना’चा ॲपलतर्फे गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

Sandip Ranade

‘नादसाधना’चा ॲपलतर्फे गौरव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गायन (Singing) आणि संगीतात (Music) पारंगत होण्यासाठी गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधना करणे अनिवार्य आहे. पण आजच्या धावपळीच्या जगात गुरुगृही राहून रियाझ करणे दुरापास्तच. यातून चुकीचे स्वर लागण्यापासून ते स्वरमंडलाच्या सोबतीचा अभाव गायकाचा आत्मविश्वास कमी करतो. यावर उपाय म्हणून पुण्यातील संदीप रानडे (Sandip Ranade) या संगीत विशारद सॉफ्टवेअर अभियंत्याने ‘नादसाधना’ (Nadsadhana) नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन (Mobile Application) विकसित केले आहे. त्याचा ॲपलने विशेष गौरव केला आहे. (Nadsadhana Mobile Application Honor by Apple)

गायकाला स्वर लावण्यापासून तानपुरा, तबला, व्हायोलिन, पियानो, घुंगरू आदी स्वरमंडलांची साथ देण्याचे काम नादसाधना करते. ॲपलच्या ‘आयओएस’ सिस्टीमवर हे ॲप्लिकेशन मोफत उपलब्ध असून, भारतीय संगीताशी समग्र निगडित असलेले हे पहिलेच ॲप्लिकेशन आहे. ॲपलच्या वतीने लाखो ॲपपैकी ‘इनोव्हेटिव्ह’ आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या ३२ ॲपची निवड करण्यात आली. त्यामध्ये नादसाधनेचा समावेश आहे. ॲप्लिकेशन क्षेत्रातील ऑस्कर समजला जाणारा हा सन्मान मिळणारे हे दुसरेच भारतीय ॲप आहे.

हेही वाचा: राज्य सरकार सहकारी बॅंकिंग क्षेत्राच्या पाठीशी- सहकारमंत्री

पं. सुरेश तळवलकर, पं. उल्हास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाने आणि रोहित मुजुमदार यांच्या सहकार्याने हा प्रवास झाला. या ॲप्लिकेशनच्या वापरातून कोरोनासंबंधी गायलेल्या गाण्याला ए. आर. रेहमान यांची पावती मिळाली. यातील वाद्याला मानवी स्पर्श लाभल्याचे हे द्योतक आहे.

- संदीप रानडे, ॲप निर्माता, संगीत विशारद

ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये

  • गायकाला घरी रियाज करताना स्वर योग्य लागला का नाही, यासंबंधी सूचना मिळते

  • सुमारे १५० रागांमधील स्वरमंडल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध

  • कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरातून गायकाला वाद्यांची साथ मिळते

  • आलाप, सरगम, बंदिश, मुखडा यानुसार वाद्य ट्यून होतात

  • ‘एआय’च्या माध्यमातून गझल, दादरा, ठुमरी, हिंदुस्थानी आदी गायनाला योग्य साथसंगत

  • व्हायोलिन, पियानो, हार्मोनियम, तानपुरा, तबला, मल्टिट्रॅक रेकॉर्डिंग उपलब्ध

loading image