नगररोड वरील बीआरटी बस थांबे अस्वच्छतेच्या विळख्यात | Bus Stop | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगररोड वरील बीआरटी बस थांबे अस्वच्छतेच्या विळख्यात
नगररोड वरील बीआरटी बस थांबे अस्वच्छतेच्या विळख्यात

नगररोड वरील बीआरटी बस थांबे अस्वच्छतेच्या विळख्यात

रामवाडी - नगर रस्त्यावरील चंदननगर तसेच विमाननगर कॉर्नर येथील बीआरटी बस थांबा अस्वच्छतेच्या विळख्याने घेरला आहे. त्याच बरोबर रात्रीच्या वेळी तळीरामाचा अड्डा बनल्याने लहान मुले व महिलां प्रवाश्यांची सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे .बीआरटी बस थांब्यावर सुरक्षारक्षक नेमणूक करावा अशी मागणी प्रवाश्यां कडून केली जात आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बीआरटी बस थांबाची स्थिती दयनीय झाली आहे . चंदननगर येथील बीआरटी थांबा हा तळीरामचा अड्डा बनला आहे. पोतेभर बाटल्यांचा खच या ठिकाणी साचला आहे.पीएमपीएमएल प्रशासनाचे दुर्लक्षा होत असल्याने बसविण्यात आलेले साहित्य चोरीलां गेले आहे. बसची माहीती सांगणारे डिजिटल फलक गायब आहे. उघड बंद होणारे संयमचलित दरवाजे बंद पडल्याने बसची वाट पाहणारे बाहेर डोकावत असतात. डिजिटल फलक बंद असल्याने कोणती बस किती वेळात येईल हे प्रवाश्यांना माहित होतं नाही. बसथांब्यावर पान गुटखा खाणार्‍यांनी पिचकार्‍या मारून बसथांबा लाल केला आहे. बीआरटी मार्गाची स्थिती फारशी चांगली नाही. एक बस थांब्यासाठी 30 ते 40 लाखांचा खर्च करण्यात आला आहे.पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांच्या समस्या कडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या सोडवल्या जाव्या अशी मागणी केली जात आहे.

भास्कर मोरे, स्थानिक रहिवासी - चंदननगर बीआरटी बस थांब्यावर सुरक्षारक्षक नसल्याने तळीरामचे जुगार व दारूचे अड्डे बनले आहे. रात्रीच्या वेळी लहान मुले व महिलांसाठी असुरक्षितता जाणवते. दुर्गंधी कचरा पसरला आहे. स्वच्छता केली जात नाही.

आरती डहाळे , प्रवासी - दररोज या बीआरटी थांब्यावरुन बस पकडते. बसची माहिती सांगणारे डिजिटल बोर्ड बंद असल्याने उघडे असणार्‍या दरवाज्यातून सतत बाहेर डोकावून पाहावे लागते अशा वेळी तोल जाऊन खाली पडेल याची मनात नेहमी भीती वाटत असते.

loading image
go to top