नागपूरच्या संत्र्यांचा बाजारात दरवळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 November 2020

केशरी, पिवळी संत्री दिसू लागतात. चवीला आंबट गोड असणाऱ्या संत्र्यांचा मोहक असा पिवळा आणि केशरी रंग पाहून ती सोलून खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. त्यामुळे दरवर्षी संत्र्यांना मोठी मागणी असते.

मार्केट यार्ड - थंडी सुरू झाली की फळ बाजारात केशरी, पिवळी संत्री दिसू लागतात. चवीला आंबट गोड असणाऱ्या संत्र्यांचा मोहक असा पिवळा आणि केशरी रंग पाहून ती सोलून खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. त्यामुळे दरवर्षी संत्र्यांना मोठी मागणी असते. फळ बाजारात नागपूर येथील संत्र्याचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाजारात आवकेच्या तुलनेत संत्र्याला मागणी चांगली आहे. तसेच भावही मागील वर्षीच्या तुलनेत साधारणतः १०-१५ टक्‍क्‍यांनी कमी आहे. शहर उपनगरासह गोवा येथून संत्र्याला मोठी मागणी वाढली आहे. फळबाजारात नागपूर भागातून दररोज ८ तर १० टन इतकी संत्र्याची आवक होत आहे. संत्र्याची आवक वाढल्याने भाव आवाक्‍यात असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी करण जाधव यांनी सांगितले. यंदा पाऊस हंगाम वेळेवर सुरू झाला आहे. पाऊस चांगला झाल्याने संत्र्याचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत साधारणतः १० टक्‍क्‍यांची वाढले आहे. सुरुवातीला बाजारात चार तर पाच टन इतकीच संत्रीची आवक होत होती, असे अरविंद मोरे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

येथून येतात संत्री
नागपूर, परतवाडा, अंजनगाव, अचलपूर, वरूड, चिखली, अमरावती येथून संत्र्यांची आवक होते. सध्या बाजारात दर्जानुसार संत्र्याच्या ८ ते १० डझनाच्या एका पेटीस ७०० ते ८०० रुपये, ११ ते १२ डझनाच्या पेटीस ६०० रुपये, १४ डझन पेटीस ५०० रुपये, २०० ते २५० नग ४५० रुपये भाव मिळत आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नागपूरच्या संत्र्याला राज्य परराज्यातील ग्राहकांसह घरगुती ग्राहक, ज्यूस विक्रेते यांच्याकडून चांगली मागणी आहे. नोव्हेंबर महिन्यापासून संत्र्याचा हंगाम सुरू होऊन तो जानेवारी महिन्याअखेरपर्यंत संपतो. 
- करण जाधव, व्यापारी, मार्केट यार्ड

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur oranges in the Pune market