48-Year-Old Man Found Murdered Near Mhasoba Temple
सुनील जगताप
उरुळी कांचन : अज्ञात कारणावरून नायगांव पेठ (ता. हवेली) येथील सुमारे ४८ वर्ष वयाच्या व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. नायगांव पेठ - वडाचीवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत म्हसोबा मंदिर परिसरात ही घटना शुक्रवारी (ता. १९) उघडकीस आली आहे. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार,उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पेठ गावच्या हद्दीत दिनांक १८/१२/२०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते दिनांक १९/१२/२०२५ रोजी दुपारी १ वा.दरम्यान अज्ञात इसमाने संपत तुकाराम चौधरी यांचा (वय ४८ वर्ष ) खून केला आहे.सदरचा खून हा पूर्ववैमन्यासातून झाला असल्याची चर्चा परिसरात आहे.