

नलवडेवाडीत स्मार्ट मीटरला विरोध
किसान काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर बसवले जुने मीटर
सातारा, ता. १० : नलवडेवाडी (ता. कोरेवाग) येथे आज महावितरणच्या मोहितेवाडी शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी व कारभार करत घरमालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार केला. स्थानिक नागरिकांनी या मनमानीला विरोध केला. त्यावेळी ग्रामस्थांवर दबाव आणण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थेट पोलिस प्रशासनाला पाचारण केले; पण शेतकरी-नागरिकांच्या एकजुटीपुढे अधिकाऱ्यांचे हे दबावतंत्र पूर्णपणे निष्फळ ठरले आहे. अखेर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली, तसेच बसवलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुनेच मीटर पूर्ववत बसवून द्यावे लागले. दरम्यान, यापुढे महावितरणने दबावतंत्र वापरून स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास किसान काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा कार्याध्यक्ष वासीम इनामदार यांनी दिला आहे.
महावितरणच्या या मनमानी कारभाराची माहिती मिळताच जिल्हा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष वासीम इनामदार, तसेच नलवडेवाडीचे सरपंच महादेव नलवडे, दुर्गावाडीचे सरपंच महिपती गाडगे यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. सर्व ग्रामस्थांनी कायदेशीर बाजू मांडत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांची गाडी रोखून धरली. अखेर प्रशासनाला आपल्या बेकायदेशीर कृत्याची चूक मान्य करावी लागली आणि जबरदस्तीने बदललेले दोन्ही स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुनेच मीटर पूर्ववत बसवून द्यावे लागले.
.................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.