कोरेगाव पार्कचे नाव कधीही बदलणार नव्हते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

महापालिकेच्या नाव समितीमध्ये कोरेगाव पार्क मधील गल्ली क्रमांक 5 ते 9 मधील भागाला पिंगळे नगर, असे नाव देण्याचा ठराव भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी नुकताच मंजूर केला आहे. त्यामुळे कोरेगाव पार्कचे नाव बदलले जाणार असून पिंगळे नगर होणार आहे, असा दावा करून काही राजकीय कार्यकर्त्यांनी गेले 8 दिवस आंदोलन केले होते. 

पुणे : कोरेगाव पार्क या भागाचे नाव कधीही बदलण्यात येणार नव्हते. काही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घटकांनी लोकांची दिशाभूल करून संभ्रम निर्माण केला आहे, अशी प्रतिक्रिया महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
महापालिकेच्या नाव समितीमध्ये कोरेगाव पार्क मधील गल्ली क्रमांक 5 ते 9 मधील भागाला पिंगळे नगर, असे नाव देण्याचा ठराव भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी नुकताच मंजूर केला आहे. त्यामुळे कोरेगाव पार्कचे नाव बदलले जाणार असून पिंगळे नगर होणार आहे, असा दावा करून काही राजकीय कार्यकर्त्यांनी गेले 8 दिवस आंदोलन केले होते. 

पुण्यात मेट्रोच्या कामाची धडकी; वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव मुठीत 

या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक नगरसेवक उमेश गायकवाड म्हणाले, " कोरेगाव पार्क हे नाव कधीच बदलले जाणार नव्हते. त्यामुळे कोणाचाही पोस्टल अॅड्रेस बदलला जाणार नाही. विद्युतनगर, कोरेगाव पार्क किंवा मीरानगर कोरेगाव पार्क, आशा आशयाचा पत्ता आहे तसेच पिंगळेनगर बाबत होणार आहे." कोरेगाव पार्क वसविण्यात पिंगळे कुटुंबीयांचा मोठा सहभाग आहे, हे लक्षात घेऊन पिंगळे नगर नाव देण्याचा ठराव मांडण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.

न्यायालयाने केला प्राजक्ता माळीविरुद्धचा खटला रद्द

पिंगळे नगर या नावाला स्थानिक रहिवाशांचा विरोध असेल तर  ते देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, नावावरून राजकीय वाद निर्माण करू नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The name of Koregaon Park was never going to change