

NCP women state president candidate
ESakal
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर, पक्षात नव्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. सूत्रांनुसार, महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत सना मलिक, सरोज अहिरे, वैशाली नागवाडे, राजलक्ष्मी भोसले आणि प्रतिभा शिंदे यांची नावे आहेत.