
जुन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बल्लाळवाडी ता.जुन्नर येथील शिवनेर प्रतिष्ठानच्या राजाराम पाटील वृद्धाश्रमात पुणे येथील नंदकुमार जाधव मित्र मंडळाने दिवाळी भेट उपक्रम राबवून निराधार ज्येष्ठांची दिवाळी गोड केली.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ज्येष्ठ निराधारांचे आश्रयस्थान असलेल्या राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्रात रविवारची (ता.८) सकाळ ही दिवाळीची पहाट ठरली. पुण्याहून येथे आलेल्या मित्रमंडळाच्या महिला भगिनींनी रांगोळ्या काढल्या, पुरुषांनी सगळीकडे आकाश कंदिलाचे तोरण बांधत दिवाळीची सजावट केली.सनई चौघड्याच्या सुरात केंद्रातील वृद्धांचे एकत्रित औक्षण करत त्यांना मिठाई भरविली यामुळे या आजी-आजोबांच्या डोळ्यात असू अन् चेहऱ्यावर हसू अशा भावपूर्ण वातावरणाने परिसर भारावून गेला होता.
सकाळचे ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या केंद्राला गहू, तांदूळ, साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी वर्षभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, उटणे थंडीसाठी ब्लॅंकेट, कानटोपी आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार जाधव, डॉ. प्रसाद खंडागळे, शिल्पकार विनोद येलापुरकर, दिलीप थोरात, अमोल कुटे, संजय ऐलवाड, सुनील जगताप, सुमन जाधव, जगन शिंदे, वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विवेक तांबोळी, उपाध्यक्ष मंगेश गाढवे, सचिव भानूदास कोकणे तसेंच कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. डॉ. प्रसाद खंडागळे,दत्ता म्हसकर,अमोल कुटे आदींनी आपले विचार व्यक्त केले.फकिर आतार यांनी सूत्रसंचलन केले.संदिप पानसरे यांनी आभार मानले.
पुण्यातील मित्र परिवाराच्या सहकार्याने गेली बारा वर्षं सातत्याने दुर्गम भागातील आदिवासी, भटके विमुक्त समाजातील नागरिकांसमवेत आपली दिवाळी साजरी करण्यात येते. समाजातील उपेक्षित घटकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. जीवनाच्या अखेरच्या वळणावर कोणाचा आसरा नाही, कोणी सगा सोयरा नाही,शरिराची साथ नाही, अशा राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्रातील कार्यक्रमाने यंदा दिवाळीची गोडी आणखी वाढली.-नंदकुमार जाधव, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.