

Theft Incident at Narayanagav Residential Societies
Sakal
नारायणगाव : नारायणगांव ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हे मळा येथील सुविधा रेसिडेन्सी व समृद्धी रेसिडेन्सी या गृहनिर्माण सोसायटी मधील सहा सदनिकांचा दरवाजा व सेफ्टी लोखंडी दरवाजाचे कडी कोंयडा व लॉक तोडून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून आज्ञात चोरट्यांनी सुमारे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 80 हजार रुपयांची रोख रक्कम असा सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना आज पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या दोन्ही सोसायटीमध्ये सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नव्हती.