Narayangaon Bazar News: नारायणगाव उपबाजारात कोथिंबीर जुडीला शेकडा ६,२००, मेथीला ३,००० रुपयांपर्यंत भाव; आवक घटल्याने दरात उसळी

नारायणगाव उपबाजारात कोथिंबीर, मेथीला विक्रमी दर; आवक घट, वाढते तापमान यामुळे भाजीपाल्याच्या भावात उसळी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
Narayangaon Market Update: Coriander Prices Soar to ₹6,200 Per Hundred Bundles

Narayangaon Market Update: Coriander Prices Soar to ₹6,200 Per Hundred Bundles

Sakal

Updated on

नारायणगाव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात बुधवारी रात्री झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या कोथिंबीर जुडीला शेकडा सहा हजार दोनशे रुपये तर मेथीच्या जुडीला शेकडा तीन हजार रुपये उचांकी भाव मिळाला. तापमान वाढीमुळे कोथिंबीर, मेथीची शेतात मर होत असल्याने आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. अशी माहिती सभापती संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com