

Narayanagaon Police Nab 2 Men with Country-made Firearm
Sakal
नारायणगाव : विनापरवाना बेकायदेशीर रित्या गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी खोडद(ता. जुन्नर) येथील दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली असून आरोपींकडून तीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे. यातील एक आरोपी खोडद येथील महाकाय दुर्बिण प्रकल्प( जीएम आरटी) येथे कंत्राटी कामगार असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात मिळाली आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील यांनी दिली.