esakal | नारायणगाव: सोसायटीच्या देखभाल वर्गणीवरून हाणामारी; पाच जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे: सोसायटीच्या वर्गणीवरून हाणामारी; पाच जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
रविंद्र पाटे

नारायणगाव: येथील सनसिटी को.ऑप.हौसिंग सोसायटीच्या देखभाल वर्गणी वरून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारी प्रकरणी दोन्ही कुटुंबातील पाच जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.

हेही वाचा: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन

याप्रकरणी सनसिटी को ऑप.हौसिंग सोसायटीत राहणारे राजेंद्र बबन भोर, ऋषिकेश राजेंद्र भोर, लता राजेंद्र भोर व नीलेश रोहिदास सरोदे, चैत्राली निलेश सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी राजेंद्र भोर याला अटक केली आहे. याबाबत देशपांडे म्हणाले नीलेश सरोदे हे सनसिटी को ऑप.हौसिंग सोसायटीचे पदाधिकारी आहेत.

राजेंद्र भोर हे सोसायटीची देखभाल वर्गणी(मेंटेनन्स) देत नाहीत. या बाबतची चर्चा सरोदे हे अन्य व्यक्ती सोबत करत होते. यावरून भोर व सरोदे कुटुंबात झालेल्या बाचाबाचीतुन तुफान हाणामारी झाली. एकमेकांना पाइप व काठीने मारहाण करण्यात आली. या बाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरून पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

loading image
go to top