Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Cause and Extent of Grape Damage : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून करून त्यांच्या सल्ल्यानुसार पंचनामे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बागा वाचवण्यासाठी अनुदानाची मागणी केली आहे.
Junnar-Ambegaon Grape Growers Get Assurance: Deputy CM Ajit Pawar Directs Immediate Scientific Assessment of Crop Damage Due to Continuous Rain.

Junnar-Ambegaon Grape Growers Get Assurance: Deputy CM Ajit Pawar Directs Immediate Scientific Assessment of Crop Damage Due to Continuous Rain.

Sakal

Updated on

नारायणगाव : जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी करावी. शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांची पाहणी करतील. अशी माहिती माजी आमदार अतुल बेनके यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com