Rising Human-Leopard Conflict in Junnar, Ambegaon, Khed and Shirur
sakal
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रोहित बाबू कापरे (वय 8) हा शेतमजुराचा मुलगा ठार झाला. जुन्नर,आंबेगाव,खेड शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याच्या वाढलेल्या घटना बाबत शासन व वनविभागाने गांभीर्याने घेऊन बिबट नियंत्रणासाठी तातडीने प्रतिबंधात्मक ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) आशिष ठाकरे यांच्याकडे केली आहे.