

Burglar arrested in Narayangaon, gold, silver, cash seized.
sakal
नारायणगाव : आरोपीकडून १६ तोळे वजनाचे सोन्याचे, ८४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार सायकल, असा एकूण सुमारे १४ लाख ३७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. या प्रकरणी विशाल दत्तात्रय तांदळे( वय २८ सध्या रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे मुळ रा. पाटेगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर ) याला अटक केली आहे.