Narayangaon Market: मेथी-कोथिंबिरीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड! नारायणगाव बाजारात महिनाभरात २० कोटींची उलाढाल

Coriander and Fenugreek Make Farmers Diwali More Profitable: भाजीपाल्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना एकरी दीड लाखांपर्यंत उत्पन्न; नारायणगाव बाजारात तेजी
Fenugreek and Coriander Prices Boost Farmers Income as Narayangaon APMC Records 20 Crore Turnover in Just One Month

Fenugreek and Coriander Prices Boost Farmers Income as Narayangaon APMC Records 20 Crore Turnover in Just One Month

esakal

Updated on: 

नारायणगाव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव भाजीपाला बाजारात मेथी,कोथिंबीर व शेपूच्या खरेदी-विक्रीतून ऑक्टोबर महिन्यात तब्बल वीस कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली.मेथी,कोथिंबीरिला सलग उचांकी भाव मिळाल्याने ऑक्टोबर महिना जुन्नर, आंबेगाव, पारनेर,शिरूर तालुक्यातील मेथी,कोथिंबीर उत्पादकांना लकी ठरला आहे.अल्पमुदतीच्या या पिकापासून बहुतेक उत्पादकांना एकरी एक ते दीड लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. दुष्काळी परिस्थितीत असलेली पाणीटंचाई, वाढलेल्या तापमानात तुषार सिंचन व मशागतीचे योग्य नियोजन करून उत्पादित केलेल्या कोथिंबीर, मेथी, शेपूच्या जुड्यांना भाव मिळाल्याने घामाचे मोल मिळाल्याची व यावर्षी दिवाळी गोड झाल्याची भावना उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...