Narayangav Crime : ....असा लागला चोरीला गेलेल्या 'तंबाखू बटव्या'चा शोध

माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अनेक मोठ्या चोऱ्या व दरोड्यांतील गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलीस आरोपींना जेरबंद करतात.
tobacco bag
tobacco bagsakal
Summary

माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अनेक मोठ्या चोऱ्या व दरोड्यांतील गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलीस आरोपींना जेरबंद करतात.

नारायणगाव - माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अनेक मोठ्या चोऱ्या व दरोड्यांतील गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलीस आरोपींना जेरबंद करतात. मात्र, नारायणगाव येथे चोरीची एक आगळीवेगळी घटना घडली आहे. आर्वी (ता. जुन्नर) येथील एका नामांकित बैलगाडा मालकाने चोरीला गेलेला तंबाखूच्या बटव्याचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधून काढला. चोरीला गेलेल्या तंबाखूच्या बटव्याच्या शोध मोहिमेची खमंग चर्चा सध्या सुरू आहे.

tobacco bag
Pune News: पुणेकरांच्या चिंचेत वाढ! जानेवारीपासून पुण्यात आढळले H3N2 विषाणूचे 162 रुग्ण; एकाचा मृत्यू

आर्वी (ता. जुन्नर ) येथील एक नामांकित बैलगाडा मालक स्टँप खरेदीसाठी नारायणगाव येथील शिवाजी चौकातील दस्तलेखनिक रवींद्र कोडीलकर यांच्याकडे आले होते. त्यांनी तंबाखू खाल्ल्यानंतर घाईगडबडीत तंबाखूचा बटवा टेबलावर ठेवला. दरम्यान ते कोडीलकर यांच्याशी चर्चा करत असताना टेबलावर ठेवलेला बटवा गायब झाला. बराच वेळ शोध घेतला मात्र तंबाखूचा बटवा सापडला नाही. यामुळे बैलगाडा मालक अवस्थ झाले.

या बाबत कोडीलकर यांनी चौकशी केली असता ते म्हणाले, येथे ठेवलेला माझा तंबाखूचा बटवा गायब झाला आहे. तंबाखूचा बटवा गायब झाल्याचे मला दुःख नाही. मात्र, त्या बटव्यात असलेली व जीवापाड जपलेली खास घडण असलेली पितळी धातूची चुना डबी त्या सोबत हरवली आहे. माझ्या दृष्टीने लाख मोलाची खास बनवून घेतलेली पितळी धातूची डबी हरवल्याचे दुःख मला झाले आहे. कितीही खर्च झाला तरी चालेल, पण मला पितळी डबी हवी आहे.

बैलगाडा मालकाची झालेली अवस्था व त्यांचे असलेले पितळी चुन्याच्या डबीवरील प्रेम पाहून कोडीलकर यांनी सुद्धा हरवलेल्या तंबाखूच्या बटव्याची शोध मोहीम सुरू केली. दरम्यान कोडीलकर यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. असता कपाळाला गंध, डोक्यावर टोपी व गळ्यात तुळशी माळ असलेल्या व्यक्तीने टेबलवरील बटवा अलगद उचलून खिशात घातल्याचे दिसून आले.

tobacco bag
Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ४० टक्के मिळकतकर सवलतीबाबत मोठा निर्णय

चौकशी अंती बटवा नेणारी व्यक्ती मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बैलगाडा मालक दस्तलेखनिक कार्यालयातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन मांजरवाडी येथे रवाना झाले. एक तासाच्या प्रयत्नानंतर बटवा नेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात यश आले. सदर व्यक्तीने चूक कबूल केली.माफी मागून तंबाखूच्या बटव्यासह पितळी डबी बैलगाडा मालकाच्या स्वाधीन केली. तंबाखूच्या बटव्यासह पितळी डबी मिळाल्याने बैलगाडा मालक आनंदित झाले.

मात्र या चोरीला गेलेला तंबाखूचा बटवा व या आगळ्या वेगळ्या चोरीच्या शोध मोहिमेची खमंग चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com