MLA Atul Benake : कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तीन दिवसांनी वाढवण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या निर्णयाचा निषेध

कुकडी डावा कालव्यात सोडण्यात आलेल्या उन्हाळी आवर्तनाचा कालावधी तीन दिवसांनी वाढवण्याचा चुकीचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. शेतकरी व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
MLA Atul Benke
MLA Atul Benkesakal

नारायणगाव - श्रीगोंदा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात सोडण्यात आलेल्या उन्हाळी आवर्तनाचा कालावधी तीन दिवसांनी वाढवण्याचा चुकीचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. निर्णयाबाबत तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबतचा आदेश कालवा सल्लागार समितीचे सदस्य सचिव सं. मा. सांगळे यांनी आज सायंकाळी कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. सध्याची पाणी टंचाईची परिस्थिती पाहता आवर्तन सुरळीत पार पडण्यासाठी धरणाचे दरवाजे, कालवा व त्यावरील दरवाजे यांचे सुरक्षिततेसाठी पोलिस दलाचे सहकार्य घेण्याची सूचना सांगळे यांनी दिलेल्या आदेशात करण्यात आली आहे.

MLA Atul Benke
Itians Variable Pay : आयटीयन्स कर्मचाऱ्यांच्या परिवर्तनीय वेतनाला पुन्हा कात्री!

कुकडी प्रकल्पाने तळ गाठला असताना जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता श्रीगोंदा तालुक्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार पोलीस बंदोबस्तात येडगाव धरणातून पाणी सोडण्याच्या या निर्णयाचा आमदार अतुल बेनके यांनी निषेध केला आहे.

दरम्यान उद्या (ता.23) सकाळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते या निर्णयाला विरोध करणारे निवेदन नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

आमदार बेनके म्हणाले आज अखेर कुकडी प्रकल्पात 1.961 टीएमसी (6.61 टक्के) नीचांकी उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे 9 मे रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव धरणातून कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, पारनेर, जुन्नर या तालुक्याच्या सिंचनासाठी कुकडी डावा कालव्यातुन 25 मे 2023 पासून तीस दिवसाचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.

MLA Atul Benke
Ringan Sohala : संत तुकोबांच्या सोहळ्यात इंदापूरात रिंगण सोहळा दोन तास रंगला

हे आवर्तन पंचवीस जूनला पूर्ण होणार होणार आहे. सद्यस्थितीत श्रीगोंदा तालुक्यासाठी सहा दिवसांचे आवर्तन सुरू आहे. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी हे आवर्तन अजून तीन दिवसांनी वाढवावे अशी मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी कुकडी प्रकल्पातील पाणी साठ्याचा आढावा न घेता कुकडी प्रकल्पाने तळ गाठलेला असताना आवर्तन कालावधी तीन दिवसांनी वाढवण्याचा व पोलीस बंदोबस्तात आवर्तन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मी स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून आवर्तन कालावधी न वाढवण्याची विनंती केली मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये आवर्तन कालावधी होण्यास विरोध केला जाईल. यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आमदार अतुल बेनके यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com