पुणे: शिरूरमधील एका गॅरेजचालकाच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या अमली पदार्थांच्या साखळीचे धागेदोरे थेट अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण यांनी मोठी कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे..Pune News: ४५ मिनिटांचा प्रवास आता ७ मिनिटांत! खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती; जूनपासून वाहतूक सुरू होणार...या कारवाईत तब्बल १० किलो ७०७ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. जप्त केलेले अमली पदार्थ हे आरोपींनी श्रीरामपूरमधील मे २००५ मध्ये जप्त केलेल्या गुन्ह्यातील अल्प्राझोलम हे अमली पदार्थ अहिल्यानगर येथील पोलिस मुद्देमालातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली आहे..१७ जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना माहिती मिळाली की, शिरूर शहरातील गॅरेज चालक शादाब रियाज शेख हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार १८ जानेवारीला मध्यरात्री बाबुरावनगर परिसरात सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत शादाब शेख (वय ४१) यास ताब्यात घेण्यात आले. .त्याच्याकडून एक किलो ५२ ग्रॅम अमली पदार्थ व दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात शादाब शेख याने हा अमली पदार्थ ज्ञानदेव ऊर्फ माऊली शिंदे, ऋषीकेश चित्तर व महेश गायकवाड (सर्व रा. अहिल्यानगर) यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या तिघांना अटक करून त्यांच्याकडून आणखी नऊ किलो ६५५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला..Solapur Tirupati flight: सोलापूर-तिरुपती विमानसेवेस पुण्याचा अडथळा; पुणे विमानतळावर स्लॉट मिळेना, स्टार कंपनीकडून सोलापुरात चाचपणी!.पोलिसाचाच हात असल्याचे उघडतपासात अमली पदार्थ आरोपी ऋषीकेश चित्तर यास श्यामसुंदर विश्वनाथ गुजर (वय ३९) याने पुरविल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे आरोपी श्यामसुंदर गुजर हा अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात पोलिस हवालदार पदावर कार्यरत असून त्याने मुद्देमाल कक्षातील अमली पदार्थाचीच विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.