
पुणे : ‘‘राजकीय दबावामुळे पोलिस सत्य शोधन करण्याचा रस्ता सोडून देतात. मालेगाव बॉम्ब खटला आणि डॉ. दाभोलकर खून खटला, तसेच ७/११ रेल्वे बॉम्बस्फोटामधील बळींना न्याय मिळाला नाही. या सर्व केसमध्ये गुन्हेगार आणि कट करणारे निर्दोष सुटले, त्यात व्यवस्थेचे अपयश आहे. या मोठ्या गुन्ह्यांत मृतांना न्याय देऊ शकले नाही, याला राजकारणी लोकांचा हस्तक्षेप कारणीभूत आहे,’’ असे मत माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी येथे व्यक्त केले.