cm devendra fadnavis and pm narendra modi
sakal
पुणे - ‘लोकसंख्या आणि अर्थकारण यात महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असणाऱ्या पुण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत लक्ष आहे. त्यामुळेच पुणे परिसरात तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे येत्या काही वर्षांत पूर्ण होणार आहेत,’ अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली. भाजपच्या महापालिकेसाठीच्या प्रचार मोहिमेचे उद्घाटन केल्यानंतर ते ‘सकाळ’शी बोलत होते.