PM Modi Pune Visit : मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात ट्रॅफिक जाम? टेन्शन घेऊ नका 'हे' आहेत पर्यायी मार्ग

PM Modi Pune Visit
PM Modi Pune VisitSakal

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या (मंगळवारी) पुणे दौरा आहे. त्यांच्या हस्ते शहरातील विकासकामांचे उद्घाटन होणार असून लोकमान्य टिळक पुरस्कारही त्यांना प्रदान केला जाणार आहे. त्यांच्या दौऱ्यानिमित्ताने पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे बदल असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून आज काही रस्ते बंद ठेवून रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.

या ठिकाणी असतील वाहतुकीत बदल

शहरातील, टिळक (अलका टॉकीज) चौक, टिळक रस्ता, देशभक्त केशवराव जेधे चौक, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, संगमवाडी रस्ता, विमानतळ रस्ता, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

PM Modi Pune Visit
"मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन्..."; धबधब्याखाली तरूणांचा भन्नाट डान्स |Dance Video

वाहनचालकांनी गैरसोय टाळण्यासाठी या मार्गांचा वापर टाळून या वेळेत इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले.

सारसबागेकडे जाणारा मार्ग खुला

टिळक रस्त्याने एस.पी. कॉलेज चौकात आल्यानंतर ना.सी. फडके चौकाकडे जाण्यासाठी (एस.पी. कॉलेज चौकातून) उजवीकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.

Traffic Police
Traffic PoliceSakal

दरम्यान, १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती असल्या कारणानेसुद्धा वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला असून सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी जेधे चौकातून सातारा रोड, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रस्ता या मार्गाचा वापर करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौक, जेधे चौक या मार्गाचा वापर करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. जेधे चौकातील फ्लायओव्हरवरून सारसबागेकडे जाण्यास प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com