मोदींसारखेच काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे, यावेळी बारामतीत आपल्याला विजय पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala Sitharaman

धायरी येथील मुक्ताई गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बोलत होत्या.

मोदींसारखेच काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे, यावेळी बारामतीत आपल्याला विजय पाहिजे

धायरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे देशात चांगले काम करत आहेत, तसेच काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात करावे. बारामती लोकसभा मतदार संघात कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही. कार्यकर्त्यांनी न घाबरता काम करावे, कार्यकर्त्यांना सर्व प्रकारची मदत पक्षाकडून दिली जाईल.

या मतदारसंघातून आपल्याला आता विजय पाहिजे असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज येथे केले.

धायरी येथील मुक्ताई गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. आमदार भिमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन खडकवासला अध्यक्ष सचिन मोरे तर आभार प्रदर्शन हरिदास चरवड यांनी मानले. यानिमित्ताने केंद्रीय पातळीवरील मंत्री धायरीत येण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता.

Web Title: Narendra Modi Work Bjp Activists Baramati Win Nirmala Sitharaman Dhayari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..