नरेंद्र मोदींच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देशाचे स्वरूप बदलत आहे - अर्थमंत्री निर्मला सीतारामन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala-Sitharaman

सिंबायोसिस भवन येथे 'भारतीय जनता पक्षा'च्या वतीने 'व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे' या विषयावर बुधवारी (ता. 21) सीतारामन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

नरेंद्र मोदींच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देशाचे स्वरूप बदलत आहे - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पुणे - 'संस्कृतीची जोपासना, डिजिटलायझेश, शेतकऱ्यांची वाढवलेली क्रयशक्ती, कोरोनाचे लसीकरण आणि देशात होत असलेली विकासकामे यासह अनेक बाबींतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला सिध्द केले आहे. खोटे आश्वासने न देता पारदर्शक कारभार करत भ्रष्टाचार मुक्त सरकार त्यांनी चालवले आहे. मोदींच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देशाचे स्वरूप बदलत आहे,' असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिस भवन येथे 'भारतीय जनता पक्षा'च्या वतीने 'व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे' या विषयावर बुधवारी (ता. 21) सीतारामन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, आमदार राम शिंदे, सुनील कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, ज्येष्ठ वकील एस. के. जैन आणि माजी खासदार प्रदीप रावत यावेळी उपस्थित होते.

सीतारामन म्हणाल्या, "जगात देश महत्वपूर्ण भूमिका बजावत असून मोदी यांनी देशाला नवीन उंचीवर नेले आहे. पद्म पुरस्कारासाठी निवड करताना देशातील सर्वसामान्य परिस्थीतीमध्ये अभूतपूर्व काम करणाऱ्यांची निवड केली जात आहे. या सारखे अनेक परिवर्तन गेल्या काही दिवसांत झाले आहेत.

आंध्रप्रदेशमधील ज्योतिर्लिंग श्रीशैल्यम मंदिर आणि तामिळनाडूतील चेन्नईमधील कलिकांबा मंदिर या दोन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिली होती आणि ती माझ्या दृष्टीने शक्ती केंद्र आहे."

'शासकीय व्यवस्था आणि आर्थिक व्यवहारात डिजिटलायझेशन वाढविण्याचे काम मोदी यांनी केले आहे. डिजिटल व्यवहार तळागाळपर्यंत पोहचेल की नाही अशी शंका एकेकाळी उपस्थित केली जात होती. मात्र आता देश यूपीआयच्या व्यवहारांबाबत आघाडीवर आहे. भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या राज्याचे नेतृत्व करीत चांगले प्रशासन असेल तर तुम्ही पुन्हा उभारी घेऊ शकता हे मोदींनी गुजरातच्या माध्यमातून दाखवून दिले आहे,' असे सितारामन म्हणाल्या.

पाटील म्हणाले, 'कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे निधन झाले त्यांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी एक पालक गमावले आहे त्यांच्या पाल्यांना देखील मोफत शिक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपला ऐतिहासिक वारसा समोर आणण्याचा प्रयत्न आहे. राज्यात एक लाख 75 हजार कोटी रुपयांची मेट्रोची कामे सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक व्यवस्था सक्षम होईल.'

भंडारी म्हणाले, 'नरेंद्र मोदी यांनी मागील 20 वर्षात जाणीवपूर्वक व्यवस्थेत चांगल्या प्रकारे बदल केले आहे. आठ वर्षाच्या पंतप्रधान काळात त्यांनी ठोस कामगिरी केली आहे. कोणत्याही योजनेच्या लाभार्थ्यांना यांच्या बँक खात्यात पैसे पाठवत सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. दीपक नागपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Narendra Modis Policy Decisions Are Changing Face Of India Finance Minister Nirmala Sitharaman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..