‘एमडी हवेत की मी?’

‘एमडी हवेत की मी?’
Published on

‘एमडी’ देशमुख यांना बदला
अन्यथा मला कार्यमुक्त करा’
-----------
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील नाराज


सकाळ वृत्तसेवा
जालना, ता. ८ : ‘‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून राज्यातील मराठा तरुणांना उद्योजक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विजयसिंह देशमुख हे कामात अडथळे निर्माण करत असून मराठा तरुणांचे नुकसान करत आहेत,’’ असे गाऱ्हाणे नरेंद्र पाटील यांनी मांडले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, ‘अध्यक्षपदावरून मला कार्यमुक्त करा किंवा त्यांची बदली करा,’ अशी मागणी करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना मी अध्यक्ष असताना व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या धोरणामुळे सध्या काहीच देऊ शकत नाही. त्यामुळे मी खुर्ची अडवून बसणार नाही. व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यपद्धतीबाबत मराठा उपसमितीचे अध्यक्ष, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवले. मात्र, त्यांच्याकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीबाबत माहिती मांडणार असून, त्यांच्या कामाची चौकशी करा किंवा त्यांची बदली करा, अशी मागणी करणार आहे. मंगळवारी उपसमितीची बैठक आहे. त्यामध्ये या अधिकाऱ्यासंदर्भात काहीतरी निर्णय घेतला नाही, तर मला माझा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला.

‘ते’ राजकीय अजेंडा राबवतात’
विजयसिंह देशमुख यांच्या नोकरीचा सर्वाधिक कार्यकाळ पुणे जिल्ह्यातच राहिला आहे. ते मराठा समाजात भाजपची आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचा ‘अजेंडा’ राबवत आहेत आणि तो पक्ष विरोधात आहे की सत्तेत आहे, याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, असेही अध्यक्ष पाटील यांनी म्हटले. मात्र, त्यांनी थेट कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही.


----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com