Two Pistol Seized
sakal
धायरी - गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नऱ्हे पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करत दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे (वय-२६, रा. स्वारगेट) आणि अथर्व ऊर्फ आप्पा उमाकांत सणस (वय-२३, रा. गुरुवार पेठ) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.