

Narhe Police Station Inaugurated on Sinhagad Road
Sakal
निलेश चांदगुडे
धायरी : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे पोलिस स्टेशनचे अधिकृत उद्घाटन सोमवारी (ता.१५) दुपारी १:३० वाजता उत्साहात पार पडले. पोलिस स्टेशन सुरू करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्यानंतर सिंहगड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाइंगडे यांच्या हस्ते या नव्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. नऱ्हे परिसरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज लक्षात घेऊन नऱ्हे पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे.