राहुल नार्वेकर वादात

राहुल नार्वेकर वादात
Published on

नार्वेकरांचे शोकप्रस्ताव वाचन वादात

मुंबई, ता. २३ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत शोकप्रस्तावाचा मराठी मजकूर वाचताना केलेल्या चुकांमुळे ते टीकेचे धनी झाले आहेत. मंगळवारी दिवसभर ते समाजमाध्यमांवर चांगलेच ‘ट्रोल’ झाले. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना नार्वेकर यांच्याकडून अनेक शब्दांचे उच्चार चुकीचा केला गेला. ते ‘यथोचित’ऐवजी ते ‘यशोचित’ म्हणाले. ‘दुर्दम्य इच्छाशक्ती’ऐवजी ‘दुर्दमय इच्छाशक्ती’, ‘आशा’ या नावाऐवजी ‘अशा’ असा उच्चार त्यांनी केला. तसेच ‘हृदया सिंहासना’वर असा शब्द त्यांनी उच्चारला. ‘दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या’ असे म्हणण्याऐवजी ‘दीनदयाळ मंगेशकरांच्या कन्या’ असा उल्लेख त्यांनी केला. सुमन कल्याणपूर यांच्या आडनावाचाही उच्चार त्यांनी चुकवला. त्यामुळे शोकप्रस्तावासारखा गंभीर मजकूर वाचतानाही उच्चारांबाबत पुरेशी काळजी न घेतल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com