

Nashik Case Row Thombre Demands Probe and Names Chakankar as Key Accused
Esakal
भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्याच नेत्या रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलाय. अशोक खरातच्या प्रकरणात चाकणकर यांना मुख्य आरोपी करावं अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केलीय. Kharat Case Controversy Thombre Calls for Strict Action and Expands Probe