esakal | गावाच्या आरोग्यासाठी धावले नाशिकचे पोलिस उपायुक्त

बोलून बातमी शोधा

गावाच्या आरोग्यासाठी धावले नाशिकचे पोलिस उपायुक्त
गावाच्या आरोग्यासाठी धावले नाशिकचे पोलिस उपायुक्त
sakal_logo
By
यूनूस तांबोळी

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून 20 बेटचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. गावच्या नागरीकांच्या आरोग्यासाठी गावानेच पुढाकार घेतल्याने पुणे जिल्ह्यात प्रथमच असे प्राथमिक उपचार देणारे कोवीड सेंटर सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे हे गणेगाव खालसा येथील तांबे कुटूंबातील पुत्र आहेत. राज्यात सुरू असणारा कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे गावातल्या नागरीकांच्या आरोग्यासाठी छोटेसे कोवीड सेंटर सुरू करण्याचे त्यांनी सुचविले. त्यानुसार जिल्हा परीषद प्राथमीक शाळेत 20 बेडचे कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा: मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटकच; मंचर पोलिसांची कामगिरी

''कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बेड व ऑक्सिजन मिळत नसल्याने मोठ मोठे दवाखाने रूग्णांनी गच्च भरले आहेत. गावतल्या नागरीकांची चाचणी होऊन अगदी तातडीने बाधीत रूग्णांवर उपचार झाले तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी नागरिकांनी कोणताही प्रकारचा हलगर्जीपणा न करता चाचणी करून घेणे गरजेचे आहे. बांधितावर तातडीने उपचार झाल्यावर कमी कालावधीत कोरोना मुक्ती मिळू शकते''. असे आवाहन तांबे यांनी भ्रमणध्वनी वरून ग्रामस्थांना यावेळी केले.

दरम्यान या कोवीड सेंटरचे उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे व वैद्यकीय अधिकारी महेश सातव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष मानसींग पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, दत्तात्रेय पाचुंदकर, रमेश तांबे, सुहास बांगर, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत वाव्हळ, उपसरपंच आबासाहेब बांगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गावच्या नागरिकांना या महामारी पासून वाचविण्यासाठी नाशीकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी गावातच सुरू केलेले कोवीड सेंटर हा उपक्रम कौतुकास्पद आहे. परीसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी या बाबत दखल घेतल गावातल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन मानसिंग पाचुंदकर यांनी केले आहे.