esakal | मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटकच; मंचर पोलिसांची कामगिरी

बोलून बातमी शोधा

manchar police
मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटकच; मंचर पोलिसांची कामगिरी
sakal_logo
By
डी. के वळसे-पाटील

मंचर : दोन मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना मंचर पोलिसांच्या पथकाने भराडी (ता. आंबेगाव) येथून शुक्रवारी (ता. २३) संध्याकाळी अटक केली आहे. तीन वर्षाची ही मांडूळ असून त्यांची किमत चार ते पाच लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही दिवसांपासून मांडूळ सापाच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत. पण आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकत नव्हते.

संभाजी बाबुराव राजगुरू (वय ३२ , रा. भराडी , ता. आंबेगाव, जि. पुणे) आणि सुनील दिलीप पवार (वय २4, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पंधरा हजार रुपये किमतीची मोटार सायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

हेही वाचा: मुळशी येथे पोलिसांची नाकाबंदी

पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस नाईक एन.बी.खैरे व दोन पंचासह पोलीस पथक भराडी येथे गेले. तेथे सापळा लावला. मोटारसायकल (१४B५३०४) वरून दोन जण निळ्या रंगाचा ड्रम घेऊन भराडी फाटा येथून जात होते. त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला. पण मोटरसायकल न थांबता पुढे गेली. पोलिसांनी पाठलाग करून मोटर सायकल थांबविली. दोन जणांना ताब्यात घेऊन निळ्या रंगाचा ड्रम उघडून पहिला. त्यामध्ये दोन मांडूळ जातीचे साप दिसून आले. आरोपींच्या विरुद्ध वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९(3) सह कलम 51 अन्वये सरकारतर्फे शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा: VIDEO: संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांची भन्नाट कारणे; ऐकून पोलिसही झाले हैराण

दरम्यान, ''दोन मांडूळ मंचरचे वनपाल आर. आर. मोमीन यांच्या ताब्यात पोलिसांनी दिली आहेत. श्रीक्षेत्र वडगाव- काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील पशुधन विकास अधिकारी प्रकाश शिंदे यांनी मांडूळाची वैद्यकीय तपासणी केली आहे. दोन्ही मांडूळ जंगलात सोडली जाणार'' असल्याचे मोमीन यांनी सांगितले.

“ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावला जाणार आहे. आरोपी संभाजी बाबुराव राजगुरू, सुनील दिलीप पवार हे कोणाला मांडूळ विकत होते, यासंदर्भात सखोल चौकशी मंचर पोलिसांनी सुरू केली आहे.”

- सुधाकर कोरे, पोलीस निरीक्षक, मंचर पोलीस ठाणे