नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Nasrapur Case Verdict : इथं साडे तीन वर्षांच्या चिमुकलीची अत्याराचानंतर हत्या करणाऱ्या नराधमाला ६० दिवसात विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. गेल्याच आठवड्यात आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलं होतं.
Nasrapur Case Verdict

Nasrapur Case Verdict

Esakal

Updated on

नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवरील अत्याचार करून तिचा खून करणारा भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आज हा निकाल दिला. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्याने हा खटला अल्पावधीत निकाली निघाला. गुन्हा घडल्यापासून केवळ दोन महिन्यांत हा खटला निकाली निघाला आहे. एकूण १३७ पानांचा हा निकाल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com