Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी ठरविले दोषी.
Nasrapur Crime Case Accused Bhimrao Kamble

Nasrapur Crime Case Accused Bhimrao Kamble

esakal

Updated on

पुणे - नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरविले. कांबळे याला मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा होणार याचा निकाल सोमवारी (ता. २९) लागणार आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. शनिवारी (ता. २९) अंतिम साक्षी- पुरावे नोंदवून झाल्यानंतर गुरुवारी (२५) सरकारपक्ष, बचाव पक्ष आणि मुळ फिर्यादी यांनी आपली बाजू मांडली. यावेळी कांबळेला हजर करण्यात आले होते. तुझ्या विरोधात दोषारोपपत्रात नमूद असलेले सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. तसेच दोषारोपपत्रात नमूद केलेल्या कलमांअंतर्गत कोणती शिक्षा होऊ शकते याची माहिती न्यायालयाने आरोपीला दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com