

Nasrapur Crime Case
esakal
पुणे - नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा तपास हा पोलिसांच्या सांघिक प्रयत्नांचा आणि अचूक नियोजनाचा भाग होता. घटनेनंतर उमटलेले तीव्र पडसाद लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला. या संवेदनशील खटल्यात अवघ्या १५ दिवसांत १२०० पानांचे भक्कम आरोपपत्र न्यायालयात दाखल केले, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुरुवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत दिली.