

Successful investigation and fast-track trial of Nasrapur rape and murder case
Sakal
पुणे : ‘‘नसरापूर परिसरातील अल्पवयीन मुलीच्या हत्याकांडामुळे जनक्षोभ उसळला होता. क्रूरतेचा कळस गाठलेल्या आरोपीच्या कृत्यामुळे आम्ही पोलिस अधिकारी असलो तरी आमच्यातील माणूसही हळहळत होता. अशा संवेदनशील स्थितीत भावनिक न होता, तटस्थ राहून गुन्ह्याची साखळी जोडत कमीत कमी वेळेत भक्कम पुरावे गोळा करणे हे आमच्यासमोर मोठे आव्हान होते,’’ अशी भावना विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकारी पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी व्यक्त केली.