
Nataraj Karandak 2022 : नटराजच्या एकांकीका स्पर्धेत मिलाप थिएटरचे यश...
बारामती : नटराज नाट्य कला मंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बारामती शाखेच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 37 व्या एकांकीका स्पर्धेत पुण्याच्या मिलाप थिएटरच्या लेखकाचा कुत्रा या एकांकीकेस नटराज करंडक प्रदान केला गेला. प्रथम क्रमांका सोबतच उत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष ही देखील पारितोषिके देखील लेखकाचा कुत्रा या एकांकीकेने पटकाविली.
या स्पर्धेमध्ये बारामती, पुणे, मुंबई, कल्याण, अलिबाग, ठाणे, फलटण, नाशिक, अंबरनाथ, सातारा ठिकाणाहून वीस संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक पुण्याच्या कलादर्शनच्या यशोदा एकांकीकेस, तर तृतीय क्रमांक कल्याणच्या स्टोरीया प्रॉडक्शनच्या ब्लाईंड स्पेस या एकांकीकेस मिळाले. अलिबागच्या फ्रायडे फिल्म प्रॉडक्शनच्या नातीचरामी व साताराच्या बाराखडी नाट्य मंडळी संस्थेच्या आर.ओ.के. या एकांकीकेस मिळाले.
यंदा नटराज करंडकाचे प्रथम पारितोषिक हरिभाऊ देशपांडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रभाकर देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आले. वैयक्तिक पारितोषिके पुढील प्रमाणे - सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री- श्वेता मोरे, सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष- प्रणव जोशी, अभिनय उत्तेजनार्थ स्त्री भूमिका- ज्योती राऊळ एकांकिका - नातीचरामी, अभिनय उत्तेजनार्थ पुरुष- आदित्य खेडेकर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - प्रणव जोशी, सर्वोत्कृष्ट रंगभूषा वेशभूषा- कलादर्शन, पुणे, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - अभिप्राय कामठे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य- ऋतुजा बोठे. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- प्रशिक कांबळे, सर्वोत्कृष्ट नवीन लेखन - चैताली गानु- ओक यांना मिळाले.
लक्ष्मण जगताप व प्रदीप परकाळे यांनी परिक्षण केले. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रशांत काटे, श्रीकांत गालिंदे, सचिन आगवणे, दीपक मुळे, मल्लिकार्जुन हिरेमठ, विनय आगवणे, प्रतीक घोडके, अमोद देव, सचिन होळकर, ॲड. अमर महाडिक, हनुमंत घाडगे आदींनी परिश्रम घेतले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.