डॉ.दाते प्रशालेला मैदानासाठी जागा मिळवून देणार राम सातपुते

डॉ.दाते प्रशालेला मैदानासाठी जागा मिळवून देणार राम सातपुते

Published on

NPT26B08642
नातेपुते (ता. माळशिरस) : एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना माजी आमदार राम सातपुते. यावेळी उपस्थित मान्यवर.
---
दाते प्रशालेला मैदानासाठी
जागा मिळवून देणार : सातपुते
‘नातेपुते एज्युकेशन’चा वर्धापनदिन कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. ५ : येथील डॉ. बा. ज. दाते प्रशालेच्या मैदानासाठी लगतच्या पाटबंधारे खात्याची जमीन मिळवण्यासाठी मी शासन दरबारी प्रयत्न करीन, असे प्रतिपादन माजी आमदार राम सातपुते यांनी केले.
येथील नातेपुते एज्युकेशन सोसायटीचा ७०वा वर्धापनदिन माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष बाहुबली चंकेश्वरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे सातपुते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक गणेश शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव अॅड. शिवाजीराव पिसाळ यांनी केले.
माजी आमदार सातपुते म्हणाले, मुला- मुलींच्या कुस्तीसाठी दहा लाखाच्या दोन मॅट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामार्फत मिळवून देईन. येथील विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला पंख लावले तर मोठे यशस्वी नागरिक तयार होतील. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्याही सहलीचे आयोजन संस्थेने करावे. या संस्थेच्या विकासासाठी मी आपल्या सोबत आहे.
प्रमुख वक्ते प्रा. शिंदे म्हणाले, आज महाराष्ट्रात यूपी, बिहार, राजस्थान, गुजरातमधील लोक विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत; मात्र आपल्या राज्यातील मुले उद्योगधंद्यात पुढे दिसत नाहीत. आत्मविश्वासाने वागणे गरजेचे आहे. शिक्षणातून आपण स्वाभिमानी होणे अपेक्षित आहे. आत्मविश्वास यायचा असेल तर कौशल्यावर काम करा. अनेक क्षेत्र खुली आहेत. डोळे विस्फारून बघा.
अध्यक्षीय भाषण बाहुबली चंकेश्वरा यांनी केले. धैर्यशील देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष संतोष काळे, डॉ. एम. पी. मोरे, डी. एन. काळे, महेश शेटे, डॉ. वर्धमान दोशी, संजय गांधी, अरविंद पाठक आदी उपस्थित होते.
यावेळी तीन डिजिटल क्लासरूमचे उद्‌घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यातील एक डिजिटल क्लासरूम मुख्याध्यापक विनायक देशपांडे यांनी देणगी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com