

Nathuram Godse RSS Volunteer Gopal Godse Interview Video Submitted in Court in a Major Development
sakal
पुणे: महात्मा गांधींची हत्या करा, असा प्रसार संघाने केला नव्हता. मात्र, वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, स्वयंसेवकाशिवाय दुसऱ्या कोणाचे धाडस झाले असते का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही ठाम भूमिका घेतलेली नसली, तरी नथुराम गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, अशा आशयाचे विधान असलेली गोपाळ गोडसे यांच्या मुलाखतीची चित्रफीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी आज येथील विशेष न्यायालयात सादर केली.