राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) - प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

प्रश्न तुमचे - उत्तर आमचे
दहावी परीक्षा पास झाल्यानंतर तरुणांना एन.डी.ए. मध्ये प्रवेश मिळविण्याबाबत अनेक शंका असतात, त्यातील काही शंकांचं निरसन.

प्रश्न तुमचे - उत्तर आमचे
दहावी परीक्षा पास झाल्यानंतर तरुणांना एन.डी.ए. मध्ये प्रवेश मिळविण्याबाबत अनेक शंका असतात, त्यातील काही शंकांचं निरसन.

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्न १ - एन.डी.ए. परीक्षेचा प्रवेश अर्ज करण्यासाठी काय पात्रता असावी लागते?
उत्तर -
बारावीमध्ये शिकत असलेली मुले अथवा बारावी पास झालेली मुले अर्ज करण्यास पात्र असतात. प्रवेश घेताना तो तरुण बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि त्याचे वय १९.५ वर्षांच्या आत असणे गरजेचे आहे.

प्रश्न २ - एन.डी.ए. मध्ये प्रवेश मिळविण्याच्या दृष्टीने अकरावी-बारावीमध्ये शास्त्र शाखा असणे जरुरी अाहे का?
उत्तर -
एन.डी.ए. मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी शास्त्र शाखेतून गणित आणि भौतिकशास्त्र घेतलेला तरुण एअरफोर्स विंग अथवा नेव्हल विंगमध्ये प्रवेश घेऊ शकताे, तर आर्मी विंगमध्ये जाण्याकरिता कोणत्याही शाखेतून बारावी झालेला तरुण चालतो; परंतु एन.डी.ए. परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने बारावीत शास्त्र शाखेतून गणित व भौतिकशास्त्र विषय असणे हिताचे आहे.

प्रश्न ३ - मुलींना एन.डी.ए. मध्ये प्रवेश मिळू शकतो का? मुलींना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जाण्याकरिता अजून कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
उत्तर -
मुली एन.डी.ए. प्रवेश अर्ज करण्यास पात्र नाहीत. पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या मुली अथवा पदवी परीक्षा पूर्ण झालेल्या मुली आर्मीमध्ये अधिकारी बनण्यासाठी सी.डी.एस. परीक्षा देऊ शकतात. त्याचप्रमाणे नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (आय.एन.ई.टी.) आणि एअरफोर्स काॅमन अॅडमिशन टेस्ट (ए.एफ.सी.ए.टी.) या परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनू शकतात.

प्रश्न ४ - एन.डी.ए. प्रवेशासाठी दहावी व बारावीमध्ये मार्कांची काही अट असते का?
उत्तर -
एन.डी.ए. प्रवेशासाठी मुलगा बारावी पास असावा लागतो. मार्कांची  कुठलीही अट नाही.

प्रश्न ५ - दहावी पास झाल्यानंतर एन.डी.ए. मध्ये प्रवेश मिळण्याच्या दृष्टीने मुलांनी काय करावे?
उत्तर -
तरुणांनी काॅलेजमध्ये अकरावी-बारावी सायन्स (पी.सी.एम.) ॲडमिशन घ्यावी. तसेच ॲपेक्स करिअर्स मध्ये ११ वी+ १२ वी+ एन.डी.ए. हे दोन वर्षाचे कोचिंग घ्यावे. या माध्यमातून अनेक तरुणांना एन.डी.ए. मध्ये जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

प्रश्न ६ - ज्या तरुणांना दोन वर्षांचे कोचिंग शक्य नाही, अशा तरुणांसाठी ॲपेक्स करिअर्स मध्ये कमी कालावधीच्या कोचिंगची सोय आहे का?
उत्तर -
ॲपेक्स करिअर्स मध्ये चार महिने, अडीच महिने आणि एक महिना असेही कोर्सेस आहेत, ज्याचा तरुणांना लाभ घेता येण्यासारखा आहे.

प्रश्न ७ - बाहेरगावी शिकणाऱ्या मुलांनी या परीक्षेची तयारी कशी करावी?
उत्तर -
एप्रिल-मे-जून च्या सुट्ट्यांमध्ये ॲपेक्स करिअर्सचे १ महिन्याचे क्रॅश कोर्सेस चालविले जातात. साधारणपणे १५ मार्च ते १५ एप्रिल, ०२ मे ते ३० मे, ०१ जून ते ३० जून या काळात हे कोर्सेस असतात. याचा फायदा बाहेरगावच्या मुलांना घेता येतो.

प्रश्न ८ - एन.डी.ए. मध्ये निवड झाल्यानंतर तरुणास पुढे किती खर्च करावा लागतो?
उत्तर -
एन.डी.ए. मधील संपूर्ण शिक्षणाचा खर्च आपले भारत सरकार करते. 
पालकांस एन.डी.ए. मधील शिक्षणासाठी खर्च करावा लागत नाही.

प्रश्न ९ - ऑफिसर बनल्यानंतर या तरुणांना किती पगार मिळतो?
उत्तर -
दरमहा एक लाख रुपयांच्या जवळपास पगार एका नव्याने कमिशन झालेल्या अधिकाऱ्याला मिळतो.

प्रश्न १० - आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये कार्यरत असलेले किंवा तेथून निवृत्त झालेले अधिकारी किंवा जवानांच्या मुलांकरिता काही जागा राखीव असतात का? किंवा या मुलांना निवड करण्यामध्ये काही प्राधान्य दिले जाते का?
उत्तर -
एन.डी.ए. मध्ये केवळ कर्तृत्त्वाच्या जोरावर तरुणांची निवड केली जाते.

प्रश्न ११ - एस.एस.बी. इंटरव्ह्यू विषयी थोडी माहिती सांगू शकाल का?
उत्तर -
सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) इंटरव्ह्यूसाठी एन.डी.ए. लेखी परीक्षा क्वालिफाय झालेल्या तरुणांना बोलविण्यात येते. ही मुलाखत पाच दिवस चालते. पहिल्या टप्प्यात इंटेलीजन्स टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन डिस्कशन टेस्ट घेण्यात येते, ज्याच्या आधारावर काही तरुण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतात. पुढील तीन दिवसांत मानसिक चाचणी, सामूहिक परीक्षण आणि वैयक्तिक मुलाखत घेण्यात येते. 

पाचव्या दिवशी काॅन्फरन्स होते, ज्यामध्ये तरुणांना १०-१२ अधिकाऱ्यांच्या पॅनेलसमोर अगदी छोटी मुलाखत (साधारपणे तीन ते पाच मिनिटे) द्यावी लागते.

प्रश्न १२ - एस.एस.बी. इंटरव्ह्यूची तयारी कोठे करता येईल?
उत्तर -
ॲपेक्स करिअर्स मध्ये एस.एस.बी. इंटरव्ह्यूची तयारी करवून घेण्याची सोय आहे. येथे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे निवृत्त अधिकारी एस.एस.बी. ची तयारी करवून घेतात.

प्रश्न १३ - ॲपेक्स करिअर्सचा पत्ता मिळू शकेल काय?
उत्तर -
ॲपेक्स करिअर्सच्या कार्यालयाचा पत्ता - महात्मा फुले वस्तु संग्रहालय आवार, घोले रस्ता, शिवाजीनगर, बालगंधर्व रंगमंदिराजवळ, पुणे. चौकशीची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी आहे. ऑगस्ट महिन्यात कार्यालय रविवारी देखील खुले राहील. मोबाईल नंबर ९८५०८८००५८ किंवा ९०२८२२१४५८ यावरदेखील आपणास माहिती मिळू शकेल.

प्रश्न १४ - एखाद्या स्पोर्ट्‌समध्ये नॅशनल खेळलेल्या तरुणांना एन.डी.ए. मध्ये निवडीसाठी काही जागा राखीव आहेत का?
उत्तर -
एन.डी.ए. मध्ये निवडीसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. यासाठी तरुणांना लेखी परीक्षा, एस.एस.बी. इंटरव्ह्यू आणि वैद्यकीय परीक्षा क्वालिफाय व्हावी लागते. जाहीर झालेल्या व्हेकन्सीजच्या आधारावर आपापल्या मेरीटप्रमाणे तरुणांना एन.डी.ए. मध्ये प्रशिक्षणास रुजू होण्याची संधी मिळते.

- लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) संस्थापक, ॲपेक्‍स करिअर्स - पुणे

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Defense Academy Admission