Pune News : विद्यार्थ्यांनी घेतली विषाणूंची माहिती; वर्धापन दिनानिमित्‍त ‘एनआयव्‍ही’ कडून विद्यार्थ्यांमध्‍ये जनजागृती

National Institute of Virology Pune student virus exhibition : पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विषाणू आणि आजारांविषयी प्रदर्शन; शास्त्रज्ञांनी पक्षी, प्राणी आणि डासांद्वारे रोग पसरतात कसे, मार्गदर्शन केले.
National Institute of Virology Pune student virus exhibition

National Institute of Virology Pune student virus exhibition

sakal

Updated on

पुणे : राष्‍ट्रीय विषाणूविज्ञान संस्‍था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्‍हायरॉलॉजी– एनआयव्‍ही) कडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्‍ये विषाणू, व त्‍यापासून पसरणारे आजार याबाबत माहिती देण्‍यासाठी लष्‍कर परिसरातील डॉ. आंबेडकर रस्‍त्‍यावरील प्रयोगशाळेच्‍या आवारात छोटेखानी प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. या संस्‍थेच्‍या ७४ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त या प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये विद्यार्थ्यांनी येथील शास्‍त्रज्ञांकडून माहिती घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com