Pune Court Delivers Verdict in National Kabaddi Player Murder Case
पुणे : एकतर्फी प्रेमातून १५ वर्षींय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. शुभम ऊर्फ ऋषीकेश बाजीराव भागवत (वय २२) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. खून झालेल्या मुलीच्या चुलत बहिणीने याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.