Pune News : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजाळे यांची सवाद्य मिरवणूक गावकऱ्यांनी केली पुष्पवृष्टी

गांजाळे यांच्यावर पुष्पवृष्टी करून गाव ते शाळेपर्यंत सवाद्य मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला
national teacher award announced to mrunal mayur ganjale of pune warm welcome
national teacher award announced to mrunal mayur ganjale of pune warm welcomeSakal

मंचर : पिंपळगाव - खडकी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आदर्श शिक्षिका मृणाल गांजाळे/शिंदे यांना केंद्र सरकारच्यावतीने २०२३ राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोमवारी (ता. २८) गांजाळे यांच्यावर पुष्पवृष्टी करून गाव ते शाळेपर्यंत सवाद्य मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला.

गावकऱ्यांचा जल्लोष व होणारे स्वागत पाहून गांजाळे अक्षरशः भारावून गेल्या होत्या यावेळी पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य मथाजी पोखरकर, सरपंच दिपक पोखरकर, उपसरपंच अर्चना, राक्षे, युवा सेनेचे सचिन बांगर, गटशिक्षणाधिकारी सविता माळी, मुख्यध्यापक कांतीलाल दंडवते याच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत थोरात व आभार बाजार समितीचे संचालक अरुण बागर यांनी मानले.

पिंपळगाव – खडकी येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व मंचर येथे भाजप किसान मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांच्या हस्ते गांजाळे यांचा सन्मान करण्यात आला.

पिंपळगाव – खडकी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! तुमच्यासारख्या शिक्षिकांमुळे विद्यार्थांसमोर आदर्श निर्माण होत आहे. पुढील सक्षम पिढी घडविण्याच्या तुमच्या कार्यास अनेक शुभेच्छा.-

- दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री

मला मिळालेला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ग्रामस्थ, पालक, व शिक्षण विभागातील अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेली प्रेरणा त्यामुळेच हा पुरस्कार मिळाला असून यापुढेही ज्ञानदान व शाळा परिसर विकासित होण्यासाठीकाम प्रभावीपणे करील."

- मृणाल गांजाळे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com