निसर्गप्रेमींनी कानिफनाथ गडाची केली स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कानिफनाथ गडावरील कचऱा स्वच्छ करून पोत्यात जमा केलेल्या कचऱ्यासमवेत निसर्गप्रेमीं

पुणे : निसर्गप्रेमींनी कानिफनाथ गडाची केली स्वच्छता

पुणे : केशवनगर येथील निसर्गप्रेमींनी दै सकाळ पेपरला आलेली "कानिफनाथ गडावर कचऱ्याचा ढीग साचुन" ही बातमी वाचली. त्याचा तातडीने विचार करुन निसर्गप्रेमींनी निर्धार पक्का करून, कानिफनाथ गडावर जावून तेथील साफ-सफाई करण्यात केली. त्यात त्यांनी आठरा गोण्य़ा कचरा गोळा केला.

निसर्गप्रेमींनी कानिफनाथ गडाच्या उत्तरेला असलेल्या टेकडीवरील म्हसोबाच्या मंदिरापासुन सुरुवात केली. गडावरील सफाईमध्ये पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, रँपर्स, प्लास्टीक पिशव्या गोळा केल्या.

हेही वाचा: महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान

गडावर निसर्गप्रेमींनी खराट्याने पुर्ण परीसर झाडून स्वच्छ केला. कचरा खाली आणून त्याची विल्हेवाट पायथ्या असलेल्या कोल एका खड्ड्यात लावली. या स्वच्छता मोहीमेमध्ये अगदी सहा वर्षाची ओवी व आठ वर्षाची काव्या पासलकर यांचा समावेश होता.

पुण्याच्या पश्चिम भागातील ट्रेकरसाठी सिंहगड आणि पुर्व भागातील ट्रेकरसाठी कानिफनाथगड व रामदरा आहे याचे पावित्र्य राखणे आम्हा सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे. गडावर येतांना आणलेला कचरा कुठेही न टाकता येतांना आणलेल्या पिशवीत घरी घेवून यावा, त्यामुळे आपल्या हातून पर्यावरणाचे आपोआपच रक्षण होईल.

loading image
go to top