

Coordination Meet After Navale Crash
Sakal
पुणे : नवले पुलावरील भीषण अपघातानंतर आज पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), पोलिस, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडी) यासह अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली. यात पुन्हा एकदा दीर्घकालीन, मध्यमकालीन आणि अल्पकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर रम्बलर्स स्ट्रीप, कॅटआय लावण्यास उशीर होऊ नये, यासाठी हे काम स्वतः महापालिकेने करण्याचा निर्णय घेतला आहे.