

Prioritizing the Mega-Project
Sakal
पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) या अपघातप्रवण भागाला प्राधान्य देऊन नवले पूल ते वडगाव पुलादरम्यान नियोजित असलेला नवीन छोटा पूल बांधणे शक्य होते. मात्र ते न करता त्याऐवजी थेट ६ हजार कोटी रुपयांच्या ३२ किलोमीटरच्या उन्नत महामार्गाचा आराखडा तयार करण्यात आला. त्याला गेल्या दोन वर्षांपासून मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यानंतर तो पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत नवले पूल व परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागणार आहे.