

A crowded scene at Pune’s Navale Bridge after another major accident, highlighting the recurring danger on this blackspot stretch of the Pune–Bengaluru Highway.
esakal
पुणे-बंगळुरु महामार्गावर नवले पूल ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो. याच पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. यात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. मागील ११ वर्षांत या पुलावर अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. या भागात घडणारे वारंवारचे अपघात, मृतांची वाढती संख्या आणि अयशस्वी ठरलेल्या उपाययोजनांमुळे नागरिक आणि वाहनचालंकामध्ये तीव्र नाराजी आहे.