

Four Injured Treated at Sassoon
Sakal
पुणे : नवले पूल परिसरात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या चौघांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी एकाला गुरुवारी प्राथमिक उपचारानंतर व अन्य तीन जणांनाही भरती करून उपचाराअंती शुक्रवारी घरी सोडण्यात आले. जखमींपैकी सायमा सय्यद (वय ९) हिच्या डाव्या पायाला इजा झाली असून, तिला शस्त्रक्रिया कक्षात डॉ. किरणकुमार जाधव यांच्या देखरेखीखाली वॉर्ड क्रमांक ८ मध्ये भरती करण्यात आले होते.