

Five Years, Most Dangerous Zone
Sakal
पुणे : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसर मागील पाच वर्षांत शहरातील सर्वांत धोकादायक ठिकाण बनला आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा भाग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ते अभियांत्रिकीतील चुका, अवजड वाहनांची ढिसाळ तपासणी आणि वेगावरील नियंत्रणाचा अभाव या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.