

Failed Promises and Stalled Projects
Sakal
पुणे : नवले पूल परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार, नवले पूल-वडगाव पुलाला जोडणारा नवा पूल उभारला जाणार, समतल विलगक करणार अशा अनेक घोषणा तीन वर्षांपूर्वी करण्यात आल्या. त्याचा आराखडा तयार करून तो केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविण्यात आला. मात्र गेल्या तीन वर्षांत प्रत्यक्षात एका इंचाचेही काम या भागात झालेले नाही. महत्त्वाचे प्रकल्प कागदावरच राहिले असून, निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत.