

Pune Navale Bridge Accident
esakal
Pune Navale Bridge Accident: काल गुरुवारी (१३ नोव्हेंबर २०२५) रोजी नवले पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. रस्त्याने येणाऱ्या अनेक गाड्या कंटेनरने उडवून दिल्या. यामुळे गाड्यांना आग लागली आणि अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला. नवले पुलावर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. तरीही प्रशासन ढिम्म राहिले आहे. तात्पुरत्या उपाययोजना केल्या की बस... पण वेगाने येणाऱ्या गाड्या कोण थांबवणार, असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो.